हवालदार काकासाहेब रेवडकर यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : तालुक्यातील वरुर येथील रहिवासी सुपुत्र लष्कराच्या म्युरेशन डेपोतील हवालदार, काकासाहेब रायभान रेवडकर (वय ४९ ) यांचे कर्तव्यावर असताना अल्पशा आजाराने निधन झाले. काल शुक्रवारी ( दि. २१ ) सायंकाळी त्यांच्यावर वरुरच्या त्रिवेणी संगमावर भक्त  पुंडलिकाच्या मंदिरा जवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कै. काकासाहेब यांचे चिरजीव रोहित याने अग्नि सस्कार केले.

त्यांच्यामागे आई रुक्मिणी बाई पत्नी द्वारकाताई व मुलगा रोहित असा परिवार आहे.हवालदार कै. रेवडकर यांनी, पंधरा वर्षे भारतीय लष्करात टी एन बटालियनमध्ये सेवा केली असून, सध्या ते पुण्याच्या खडकी येथे सेवेत होते. प्रशासन अधिकारी, कर्नल पी एस, राणावत यांच्या नेतृत्वाखाली तिरंग्यने लपेटलेल्या, शव पेटीत कै. रेवडकर यांचा, मृतदेह वरुर येथे आणण्यात आला.

यावेळी, शवपेटी सोबत सुभेदार सतीश बरडे, हवालदार, अनिल महाजन, नाईक पोपट देवकर होते. सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, या घोषणांनी परिसर हळहळला होता. भक्त पुंडलिक मंदिरा जवळ, त्रिवेणी संगमावर जिल्हा, पोलिस दलाच्या वतीने तसेच लष्कराच्या एम. आय. सी. अँड एस. च्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

शेवगाव पोलिस ठाण्याचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आशिष शेळके व सुभेदार के मुधु कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. निवासी नायब तहसीलदार रवी सानप, गटविकास अधिकारी, राजेश कदम, जिल्हा सैनिक अधिकारी, विद्यासागर कोरडे, शेवगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विनोद शेळके, यश फाउंडेशनचे संजय डोंगरे, ज्ञानदेव गुंजाळ, तसेच हर्षदा काकडे , दिनेश लव्हाट, उमेश भालसिंग, श्रद्धा सातपुते, सुधीर म्हस्के, पोपट काळे, आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.