कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव तालुक्यात पोलीसांपेक्षा चोरांची दहशत वाढली असुन चोरांचा सुळसुळाट वाढल्याने तालुक्यात चोऱ्यांचे सञ सुरू झाले आहे. तालुक्यातील सुरेगाव उजव्या कँनाल नजिक राहणाऱ्या बेसहारा विमलबाई कापसे यांचे घर फोडुन चोरट्यांनी रोख रकमेसह लुगडे साड्या घरातील भांड्याची चोरी केल्याने सुरेगाव परिसर चोरट्यांच्या उच्छादाने हैराण झाला असुन पोलिसांना अद्यापही एकही घरफोडीचा तपास लावण्यात आलेले अपयश गुन्हेगारांना अभय देणारे ठरत आहे.
सुरेगाव गोदावरी उजव्या कँनाल श्रीराम चौका नजिक राहणाऱ्या बेसहारा विमलबाई शंकर कापसे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडुन चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक करुन घरातील पेटीत ठेवलेली रोख रक्कम पितळेची भांडी नववारी साड्या चोरुन नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी विमलबाई घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आला. काही दिवसांपूर्वी घराशेजारी राहणाऱ्या सिंधुबाई जाधव यांचे तोंड दाबून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न सांयकाळी नऊ वाजता चोरट्यांनी केला असता सिंधुबाई यांनी आरडाओरडा केल्याने चोरांनी पळ काढला होता.
या प्रकाराने भयभीत होवुन विमलबाई रात्री जेवन झाल्यानंतर दुसरीकडे झोपण्यासाठी जातात. नेमकी हिच संधी साधुन बेसहारा विमलबाईच्या घरातील रोख रकमेसह भांडे व कपडे चोरट्यांनी लंपास केले बाजारातुन आनलेल्या सिताफळावर ताव मारत चोरट्यांनी आपला कार्यभाग बेसहारा महिलेच्या घरातील वस्तू चोरून नेत साधला. भरदिवसा मढी येथील बापु गवळी यांचे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांचा लाखोचा ऐवज लंपास केला होता.
सुरेगाव अंबिकानगर येथील रहिवासी सानप यांच्या बंद घरातील रोख रक्कम व सोने चोरीला गेले होते. कोळपेवाडी पिक्चर थिएटर परिसरातील रहिवासी संजय गांधी बाहेर गावी गेले असता त्याच्या बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी ४२ इंची एलईडी टिव्ही चोरुन नेला होता त्यांच्या घरातील सामान चोरीला जाण्याची हि तिसरी घटना होती. घरासमोर लावलेल्या मोटारसायकल विहिरी वरिल ईलेक्ट्रिक मोटार केबल स्टार्टर घर फोडी दुकान फोडीच्या घटनानी हा परिसर पुरता बेजार झाला असुन रहात्या बंद घरालाच चोरट्यांनी आपले सावज केले आहे.
परिसरात वाढलेले अवैध धंदे हे गुन्हेगारी क्षेत्राचे बिज असुन पोलिसांनी अवैध धंद्याना पुरवलेले अर्थपुर्ण संरक्षण गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. पोलीस औट पोस्ट कोळपेवाडी या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षका सह पाच पोलीस पश्चिम भागातील जनेतेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आले असतांना या ठिकाणी नेमणुकिस असलेले पोलीस सदैव तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. सतत बंद असणारे कोळपेवाडी पोलीस औट पोस्ट या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देता येत नसतील तर गावाची पोलीस वसाहती साठी दिलेली सत्ताविस गुंठे जागा ग्रामपंचायतला वर्ग करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.