कोपरगाव बाजार समितीत कांद्याला २००० रुपये भाव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०६ : कोपरगाव बाजार समितीत शन‍िवार ओपन कांद्याला उच्चांकी २००० रुपये भाव मिळाला असुन, आवक १४८८० क्विंटल एवढी झाली आहे. १ नंबर कांद्याला २००० ते १६०० रुपये भाव मिळाला. २ नंबर कांद्याला १५७५ ते ११०० रुपये भाव मिळाला, तर ३ नंबर कांद्याला १०७५ ते ३०० रुपये भाव मिळाला.

कोपरगाव बाजार समितीमध्ये कोपरगाव तालुका तसेच शेजारील वैजापुर, गंगापुर, येवला, नांदगांव, सिन्ऩर या तालुक्यातील शेतकरी आपला कांदा मोठया प्रमाणात विक्रीस आणत असल्याने आवक वाढली आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी दिली. कोपरगाव बाजार समितीमध्ये उघड लिलावाच्या बोलीने सर्व भुसार व कांद्याचे लिलाव होत असल्यामुळे, शेतक-याचे शेतमालाला उच्चांकी भाव मिळत आहे.

बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतकऱ्याच्या पट्टीत कुठलीही कपात केली जात नाही. तसेच पैशाची हमी असुन रोख अथवा RTGS ने पेमेंट केले जाते, असे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सांगितले. कोपरगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव तेजीत असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण दिसुन येत आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी, प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगाव बाजार समितीच्या मुख्य़ व उपबाजार समिती, शिरसगाव-तिळवणी येथे विक्रीस आणावा व आपला आर्थिक फायदा करुन घ्यावा असे, आवाहन सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, सहा. सचिव एम.यु. थोरात व सर्व संचालक मंडळ यांनी शेतक-यांना केले आहे.