कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूलच्या प्रशस्त मैदानावर संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.
गौतम पब्लिक स्कूलच्या एन.सी.सी. स्काऊट व गाईड यांच्या शिस्तबद्ध पथकाने नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली. शाळेच्या व गौतम युरो किड्सच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी प्रमुख अतिथी चैताली काळे यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती व स्वातंत्रदिनाचे महत्व समजावून सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शुर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत असून शूर स्वातंत्र्य सैनिकांचा व देशाचा अभिमान बाळगणे आपले कर्तव्य असल्याचे चैताली काळे यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी अभिषेक काळे, संचालक सिकंदर पटेल, बाबासाहेब कोते, गौतम पब्लिक स्कुलचे प्राचार्य नुर शेख, गौतम पॉलिटेक्निकचे प्राचार्य सुभाष भारती, सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, न्यू इंग्लिश स्कूल देर्डेचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
तसेच शाळा महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्तविक मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. अशोक होन व प्रा. सागर मोरे तर आभार प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी मानले.