स्वातंत्रदिनी अभिजित पंडोरे यांनी विद्यार्थ्यांना वाटले शंभर वृक्ष 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : शहरातील कोपरगाव बेट भागातील कचेश्वर मंदिराजवळील पालिका शाळा क्रमांक ५ च्या विद्यार्थ्यांना जगदंबा आर्युवेदीकचे वैद्य अभिजित पंडोरे यांनी भारतीय स्वातंत्रदिनाचे औचित्य साधत मुलांना शंभर वृक्षांचे मोफत वाटप केले. मुख्याध्यापक विलास माळी यांनी त्यांचा सत्कार केला. 

श्रावण मासानिमीत्त कचेश्वर मंदिर परिसरातही पुजारी रमेश क्षीरसागर व त्यांचे सहकारी वृक्षारोपण करणार आहेत. वैद्य अभिजित पंडोरे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, दिवसेंदिवस पर्यावरणाचा -हास होत आहे. वाढत्या भूवैष्मीकीकरणामुळे पर्जन्यमानाचे प्रश्न तयार झाले आहे.

त्यासाठी जास्तीत जास्त वनसंपदा असणे गरजेचे आहे. याप्रसंगी उपशिक्षक सुनिल राहणे, नसरिन इनामदार, अमोल कडु, ओम पंडोरे आदि उपस्थित होते. सुनिल राहणे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.