एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रद्धा पुंडे व गिता थोरात व्दितीय 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. श्रद्धा पुंडे हिने महाविद्यालय गटातून व कु. गिता थोरात हिने खुल्या गटातुन एकपात्री अभिनय स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे.

Mypage

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्पना फाउंडेशन, कोपरगाव आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाल्या. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालय व खुल्या गटात संपन्न झाली होती. यापैकी महाविद्यालयीन गटातून कु. श्रद्धा पुंडे हिने व खुल्या गटातुन कु. गिता थोरात यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. त्यांना क्रमशः रोख रक्कम ७०१, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या गटातुन प्रसाद चौधरी याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

Mypage

प्रसादने या आगोदर माईम या कला प्रकारात मुख्य भूमिका करून विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. कु. श्रद्धा पुंडे व कु. गिता थोरात दोघीही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थिनी असुन त्यांनी अनेक सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतही त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिलेला आहे.

Mypage

या दोघीनाही सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *