
शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : वरुर येथील प्रगतिशील शेतकरी देवराम रंभाजी म्हस्के (वय-९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या मागे तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवडे असा मोठा परिवार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त माजी प्राचार्य तथा शेवगावातील बांधकाम साहित्य व्यवसायिक काका म्हस्के यांचे ते वडिल होते.

ReplyReply allForward |