सप्ताहाचे औवचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : सालवडगाव येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे औवचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

खरडगाव केंद्राच्या आरोग्य वर्धिनीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शंभर स्त्री-पुरुषांनी हिमोग्लोबिन, शुगर तपासणी करून घेतली. तसेच विविध रुग्णांच्या आजाराची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.

डॉ. एल. जी. राठोड, आरोग्य सेवक के. एस. पवार, आरोग्य सेविका एम. एन. कसबे त्यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची रक्त तपासणी केली. आशा स्वयंसेविका रेणुका म्हस्के, मुक्ता टेकाळे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. 

ReplyReply allForward