कोपरगाव प्रतिनिधी, दि.१ : निसर्गाच्या लहरीप्रमाणे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेती व्यवसाय बिन भरवशाचा झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी केले.
येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांचे भाचे व राहता तालुक्यातील संक्रापुर येथील रहिवासी शिवचंद्रपाल बाळासाहेब जाधव यांची कृषी मंडळ अधिकारी या पदावर नियुक्ती झाली तसेच अक्षय मधुकर आव्हाड यांना बेसबॉल खेळातील महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल त्यांचा जेऊरकुंभारी पंचक्रोशीच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे व्यवस्थापक पंकज भोंगळे यांनी शिवचंद्रपाल जाधव व अक्षय आव्हाड यांनी आपल्या मेहनत व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले असून तरूणांसमोर एक आदर्श ठेवला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी पं.स.सभापती शिवाजी वक्ते, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक सतिष आव्हाड, मा.संचालक मधुकर वक्ते, मा. सरपंच रमेश वक्ते, मा.सरपंच सखाहरी चव्हाण, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, विजय रोहम, राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आजचा सत्कार आमच्यासाठी खूप मोलाचा असल्याचे प्रतिपादन शिवचंद्रपाल जाधव व अक्षय आव्हाड यांनी केले.
याप्रसंगी अविनाश आव्हाड, धोंडीराम वक्ते महेंद्र वक्ते, भानुदास वक्ते, रामभाऊ वक्ते, भाऊसाहेब वक्ते, संदिप राऊत, रावसाहेब वक्ते, गिरधर गुरसळ,संजय वक्ते,जालिदर चव्हाण, प्रदिप गायकवाड, शशिकांत गुरसळ, नारायण गुरसळ, तुषार गुरसळ,दिंगबर वक्ते, साहेबराव वक्ते,शिवाजीराव वक्ते,अशोक होन,भाऊसाहेब होन,दिंगबर गुरसळ, रावसाहेब होन, बाळासाहेब जाधव, नानासाहेब होन,
शंकर वक्ते, विलास धिवर, किरण एकनाथ वक्ते, किसन वक्ते शामराव वक्ते, आनंदराव वक्ते, मच्छिंद्र वक्ते,सतिष पवार, पांडूरंग वक्ते, राजेंद्र वक्ते, विक्रम वक्ते, कर्णा वक्ते ,किरण वक्ते,रामभाऊ वक्ते, विलास धिवर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले, तर आभार संजय शांतीलाल वक्ते यांनी मानले.