वाघोलीतील वृक्ष वाटप पंधरवाडयाचा समारोप

शेवगाव प्रतिनिधी, दि.१ : माझी वसुंधरा अभियानान्तर्गत केलेल्या आदर्श कामामुळे प्रकाश झोतात आलेल्या आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाकडे वाटचाल करत असलेल्या तालुक्यातील वाघोलीच्या प्रेमात भलेभले दिवाणे झाले आहेत. वाघोलीने केलेली ही प्रगती पहाण्यासाठी, अभ्यासन्यासाठी येणाऱ्याचा सिलसिला रोज वाढत आहे.

तालुक्यात परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी म्हणून काही काळासाठी आलेल्या बी चंद्रकांत रेड्डी देखील वाघोलीच्या मोहात पडले असून  त्यांनी काल गुरुवारी आपला वाढदिवस वाघोलीत अतिशय साध्या पद्धतीने साजरा करत आनंद उपभोगला.

 यावेळी  ग्रामस्थ महिलां भगिनीनी रेड्डी यांना औक्षण करत रक्षाबंधन साजरे केले. त्यांनी ही सर्व महिलांना आपली स्मृति कायम राहिल अशा एकेक वृक्षायी भेट दिली. रेड्डी यांनी स्वतः देखील वृक्षारोपन केले. शाळेतील लहान मुलांसोबत गप्पा मारल्या. सध्या वाघोलीत चालू असलेल्या वृक्ष वाटप पंधरवाडयाचा समारोप रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आला.

         यावेळी युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग, सरपंच सुस्मिता भालसिग, डॉ. प्रियंका गवळी,तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष दातीर, माजी सरपंच बाबासाहेब गाडगे, राजेंद्र जमदाडे, रावसाहेब शिंगाटे, गोरख दातीर, दगडू बोरुडे, बाजीराव आल्हाट, सोपान जमधडे, बाप्पा भालसिंग, किशोर शेळके, महेश आहेर, ग्रामसेविका जनाबाई फटाले, आशा बडे, अलका कोरडे, पुनम आगलावे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.