माजी आमदार अशोकराव काळे यांनी घेतली उपोषण कर्त्यांची भेट

कोपरगाव प्रतिनिधी दि. १२:  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आमरण उपोषण व आंदोलने करीत आहे. त्याप्रमाणे कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे मराठा समाज बांधव सोमवार (दि.११) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. 

या उपोषण कर्त्यांची माजी आमदार अशोकराव काळे यांनी नुकतीच भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून तब्बेतीची काळजी घ्यावी असा भावनिक सल्ला दिला. मागील चौदा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेवून मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

यावेळी उपोषणकर्ते अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विजय भगत यांच्यासह अॅड. शंतनु धोर्डे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, सतीष कृष्णाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकिर कुरेशी, दिनकर खरे, अजीज शेख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, 

गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, मुकुंद इंगळे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, प्रशांत वाबळे, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, मनसेचे योगेश गंगवाल, सचिन गवारे, विक्रम मांढरे, इम्तियाज अत्तार, शुभम लासुरे, अॅड. मनोज कडू, नारायण लांडगे, विकास बेंद्रे, राजेंद्र आभाळे, संतोष शेजवळ, किशोर डोखे, योगेश वाणी, अमोल आढाव, फिरोज पठाण, हारुण शेख, मंदार हिंगे, अनिरुद्ध काळे आदी उपस्थित होते.