कोपरगावात भाजपतर्फे श्रमदानातून बसस्थानक परिसरात साफसफाई 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (१ ऑक्टोबर) कोपरगाव शहरातील बसस्थानक परिसरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रमदान करून बसस्थानक परिसरात साफसफाई केली.

Mypage

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०५ व्या भागात ‘एक तारीख, एक घंटा, एक साथ’ असा नारा देत, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीचे औचित्य साधून १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने कोपरगाव शहरासह मतदारसंघात ठिकठिकाणी गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ असे एक तास ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कोपरगाव येथील बसस्थानक परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एक तास श्रमदान करून साफसफाई केली.

Mypage

या अभियानात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, माजी जि. प. सदस्य केशवराव भवर, बाळासाहेब नरोडे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, विजय आढाव, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, रिपाइं (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, कैलास खैरे, वैभव गिरमे, जयेश बडवे, दीपक जपे,

Mypage

रवींद्र रोहमारे, महेश खडामकर, खालिकभाई कुरेशी, जगदीश मोरे, फकिर मोहम्मद पहिलवान, इलियास खाटिक, शफिकभाई सय्यद, दादासाहेब नाईकवाडे, संतोष साबळे, जगन्नाथ कांबळे, जयप्रकाश चिकटे, लियाकतभाई शेख, जयप्रकाश आव्हाड, संजय खरोटे, शफिकभाई सय्यद, अनिल जाधव आदींसह भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Mypage

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन २०१४ मध्ये सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ ला आता राष्ट्रीय लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधीजींचा स्वच्छतेचा संदेश देशभर पसरवून जनतेत स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली. दैनंदिन जीवनात स्वच्छतेला किती महत्त्व आहे हे त्यांनी स्वत:च्या कृतीतून जनतेला पटवून दिले आहे.

Mypage

‘स्वच्छ भारत अभियाना’ मुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. या अभियानांतर्गत सरकारच्या वतीने यावर्षीही देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यात नागरिकांनी सक्रिय योगदान द्यावे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता ठेवण्यासोबतच सर्वत्र स्वच्छता ठेवून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी केले आहे.

Mypage