वकीलांनी काळानुरूप स्वतःत बदल करणे गरजेचे – न्यायाधिश विभा कंकणवाडी

Mypage

 कोपरगाव कनिष्ठ दिवाणी व वरिष्ठ दिवाणी न्यायालय नवीन ईमारत भुमीपुजन व कोनशिलेचे अनावरण

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : काळ जसा बदलत आहे, त्यानुसार वकीलांनी स्वतःत बदल करणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्ही मागे पडाल असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिश विभा कंकणवाडी यांनी व्यक्त केले. कोपरगाव येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय नवीन ईमारत भुमीपुजन व कोनशिला उद्घाटन न्यायाधिश विभा कंकणवाडी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

tml> Mypage

यावेळी व्यासपिठावर मुंबई उच्च न्यायालयचे न्यायाधिश संतोश चपळगावकर, अहमदनगर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, महाराष्ट्र व गोवा बार असोषिएनचे सदस्य अॅड. अमोल सावंत, कोपरगाव दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर स्वरूप बोस, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मनोहर येवले आदी उपस्थित होते.

Mypage

दरम्यान दिप प्रज्वलन करून न्यायाधिश विभा कंकणवाडी यांच्या हस्ते कोपरगाव कनिष्ठ दिवाणी न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय नवीन ईमारत भुमीपुजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

Mypage

न्यायाधिश कंकणवाडी पुढे म्हणाल्या की, येत्या काही वर्षामध्ये डीजीटल कोर्ट कामकाज सुरूवात होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक वकील बंधुनी संगणकाचे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. ईमारतींची समस्या प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळत आहे. भविष्यातील विचार करून कोणत्याही वास्तुची उभारणी केली जाते. त्यावेळी गरज कमी होती परंतू आता वाढते दावे आणी केसेसमुळे इमारत अपुरी पडत असल्याने कामकाजात अडचणी येत होत्या. नवीन ईमारतीमुळे नक्कीच काकाजात गती येईल.

Mypage

ही ईमारत 4 मजली असुन यामध्ये ६ कोर्ट हाॅल, प्रशस्त जेंट्स व लेडीज बार रूम, पार्किंगच्या सुविधेसह विविध सुविधा देण्यात आलेल्या आहे. सदर ईमारत पुर्ण होण्यास २ वर्ष कालावधी लागणार असल्याने ठेकेदाराने ईमारतीचे काम वेळेत पुर्ण करण्याची विनंती देखील न्यायाधिश कंकणवाडी यंनी केली.  

Mypage

दिवाणी दाव्यामध्ये न्यायदानासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी वकील व न्यायाधिशांनी त्यात लक्ष द्यावे त्यामुळे दिवाणी दावे प्रलंबित राहणार नाही. योग्य नियोजन झाले तर समस्येचे वेळेत निराकरण होवु शकते. कोपरगाव वकील संघाचा प्रतिभासंपन्न इतिहास आहे. तो वारसा असाच पुढे चालु ठेवावा असेही त्या म्हणाल्या.

Mypage

न्यायव्यवस्था ही सामान्य पक्षकारांसाठी आहे. सर्वसुविधा युक्त ईमारत लवकरात लवकर पुर्ण झाल्यास न्यायव्यवस्था देखिल गतीमान होईल असे मनोगत महाराष्ट्र व गोवा बार असोशिएनचे सदस्य अॅड. अमोल सावंत यांनी केले. वाकीलांशिवाय न्यायमंदिर नाही, वकील हे न्यायमंदिराचे राखणदार आहेत. वकीलच बारला सन्मान मिळवुन देतात. वकील संघामध्ये गुणवत्ता असेल तर तीच गुणवत्ता न्यायाधिशांमध्ये येते असे मनोगत  न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले. कोपरगाव वकील संघाने उत्कृष्ट परंपरा जोपासली आहे. वकीलांची प्रतिमा म्हणजेच न्यायव्यस्थेची प्रतिमा असते. त्यामुळे समाजामध्ये वावरतांना ही प्रतिमा नेहमी जपावी असे मनोगत न्यायाधिश संतोष चपळगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मनोहर येवले यंनी केले.

Mypage

यावेळी कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. बी. कोऱ्हाळे, जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.एम. पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. बी. देसाई, न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. ए. शिलार, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी.डी. पंडीत, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एम बनसोड यांचेसह अहमदनगर, संगमनेर, राहता येथील न्यायाधिश, गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रविकाका बोरावके, अरूण येवले, कैलास ठोळे,

माजी अध्यक्ष अॅड. एस.पी. खामकर, उपाध्यक्ष अॅड. एस.डी. गव्हाणे, महिला उपाध्यक्ष अॅड. ज्योती भुसे, सचिव अॅड. दिपक पवार अॅड. व्ही.जी. सदाफळ, अॅड. पी.एम. गुजराथी, अॅड. अशोक टुपके, अॅड. जयंत जोशी,  अॅड.एस.एम. वाघ, अॅड. एस.डी. कुलकर्णी, जेष्ठ विधिज्ञ अॅड. आर.टी. भवर अॅड. सी.एम. वाबळे, अॅड. एस.व्ही. देव अॅड. भास्कर गंगावणे, अॅड. शंतनु धोर्डे यांचेसह अनेक सिनिअर ज्युनिअर वकील व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कोपरगाव दिवाणी न्यायाधिश वरीष्ट स्तर स्वरूप बोस यांनी उपस्थिांचे आभार मानले. तर अॅड. महेश भिडे, तुकाराम डरांगे यांनी सुत्रसंचालन केले.