कोणत्याही क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही – किशोरी शहाणे

रेणुका माता मल्टीस्टेटच्या गुणगौरव सोहळ्यात बक्षीसांची लयलूट

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : प्रोत्साहनातून सर्वांचीच प्रगती होत असते. कलाकाराना पुरस्कार मिळतात, मलाही उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नुकतेच दोन पुरस्कार मिळालेत, मात्रआयुष्याच्या या प्रवासात कधी इन्सेंटिव्ह मिळाला नाही म्हणून श्री रेणुका माता मल्टीस्टेट जॉईन करावी असा मोह झाल्याची भावना  प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी येथे व्यक्त केली.

     देशातील नऊ राज्यात १३८ शाखामधून तब्बल अडीच लाख कोटीची उलाढाल करणाऱ्या श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेतील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शाखांचा वार्षिक गुणगौरव सोहळा काल रविवारी नगर येथील माऊली सभागृहात तारकेश्वर गडाचे महंत शांतीब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांचे अध्यक्षतेखाली, सिनेअभिनेत्री शहाणे यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या  परिवारातील सदस्याना तब्बल ५१ लाख रुपयांची रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   शहाणे म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही. संस्था आपल्या कार्याची अशाप्रकारे दखल घेत असताना आपली जबाबदारी निश्चितपणे वाढते; इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा करा. असा सल्ला देऊन संस्थेने अशा प्रकारे गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह देण्याची सुरू केलेली प्रथा निश्चीत पणे अद्वितीय आहे.

       श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचा पायंडा पडलाआहें. श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या सर्व शाखातील चौदाशे सेवकांपैकी निवड झालेल्यांना कमीत कमी पाच हजारापासून ७१ हजारापर्यंत वैयक्तिक तर प्रथम आलेल्या पाथर्डी  शाखेस एक लाख ५१ हजार रु रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ  देऊन गौरविण्यात आले. तर शेवगाव शाखेस एक लाख २१ हजार रोख, सन्मान चिन्ह, शाल पुष्पगुच्छ असा द्वितीय पुरस्कार तर ७१ हजार रोख स्मृतीचिन्ह, पुष्प गुच्छा असा तृतीय पुरस्कार देऊन परळी शाखेस  गौरविण्यात आले.

तसेच बहुतेकांना पदोन्नतीची पारितोषिके बहाल करण्यात आली. त्यातून त्यांना वार्षिक वेतनवाढीच्या रूपाने दरमहा किमान तीन ते सात हजाराचा कायमचा लाभ होणार आहे. दिवाळी सारखा मोठा सण दोन महिन्यावर आला आहे. घवघवीत पारितोषकाच्या माध्यमातून श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या सेवकांची दिवाळी खऱ्या अर्थाने आजच  झाली आहे.   याप्रसंगी संस्थेचे मुंबईचे  सी.ए धर्मेश शहा, दामुअण्णा काकडे, विष्णुपंत भालेराव, डॉ. वैभव अजमिरे, पाथर्डीचे  प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके,  माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गळगट्टे, प्रा. उपेंद्र गळगट्टे, श्रीमंत घुले, रामदास गोल्हार, एस.के.जाखडे, राहुल जोशी, मंगलताई भालेराव, जयंती भालेराव, मनीषा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

       सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आदिनाथ महाराज शास्त्री यांचे मौन असल्याने त्यांनी डॉ प्रशांत नानाच्या मस्तकावर हात ठेवत उदंड आशिर्वादाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांनी सध्या सर्वत्र  उद्दिष्टांचा जमाना असल्याचे सांगून श्री रेणुका माता मल्टीस्टेटची प्रगती  उद्दिष्टपुर्ती मुळेच होत असल्याचा निर्वाळा दिला. डॉ.भालेराव यांनी चांगले काम करणाऱ्या व उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या सर्वांची संस्था दखल घेते तसेच चूका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते.  संस्थेच्या मुशीत तयार झालेले अनेक जण आज मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेत उच्च पदी कार्यरत असल्याचे  सांगून संस्थेतील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या वैयक्तिक वैद्यकीय सेवेचा लाभ त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा देण्यात  येईल, महिलां कर्मचार्‍याच्या बाळांतपणासाठी सवेतन रजा सुविधा तसेच भविष्य निर्वाह निधी द्वारे राज्य व केंद्राची डबल पेन्शन योजना लागू होणार असल्याचे निर्णय जाहीर केले. तेव्हा सर्व सेवक वृंदावनी टाळ्याच्या गजरात निर्णयांचे स्वागत केले.

      माजी  महापौर फुलसौंदर  यांनी  हजारो शिंपल्यात एखादा मोती निघतो. तसे लक्षावधी माणसातून नाना सारखा एखादाच कर्तृत्वान माणूस उदयास येतो. रेणुकाचे मालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सारखा अलौकिक सुसंवाद मला अन्यत्र आढळला नाही. अशा शब्दात त्यांचे कौतूक केले. दैनिक दिव्य मराठीचे संपादक अनिरुद्ध देवचक्के यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, अर्थतज्ञ डॉ. भालेराव यांनी श्री रेणुका मल्टीस्टेट परिवारात कौटुंबिक भावना निर्माण केल्याने सर्वांनीच जीव ओतून काम करून संस्था नावारूपाला आणली आहे.        यावेळी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे,  राजेंद्र बच्छावत, पुढारीचे संपादक संदीप रोडे, झी वृत्त वाहिनीचे वसंतराव झावरे पाटील, संस्थेचे कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे याचीही भाषणे झाली.

यावेळी पत्रकारितेतील नारद पुरस्कार मिळाल्या बद्दल श्री देवचक्के यांचा, नाशिक विभाग पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री लंके यांचा तर कृषी उपसंचालक परीक्षा उत्तीर्ण झालेले पवन नजन यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. प्रारंभी दीप प्रज्वलन करून श्री रेणुका माता व स्वर्गीय चंद्रकांत दादा भालेराव व योगेश भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  श्रीमती वीना दिघे यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड गणेश शेंडगे यांनी आभार मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अॅड नितीन भालेराव, उपाध्यक्ष पांडुरंग देवकर,  प्रशासकीय अधिकारी कार्तिक, दिनेश टकले, अतुल इथापे,  पोपट काळे, सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, गणेश गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.