ट्रक दुचाकीच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : तालुक्यातील नगर – मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डीगणेश शिवारात ट्रकने दुचाकीला भीषण धडक दिल्याने दुचाकी वरील पुरुष व महिलेसह तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मयत झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Mypage

 याबाबत अधिक माहिती अशी, खिर्डीगणेश शिवारात दुपारी तीन वाजता येवल्याकडे जाणारा ट्रक क्रमांक आर जे 14 सी जे 3468 ने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 41 जून 24 51 ला जोराची धडक दिली. त्यात दुचाकी वरील एक पुरुष व महिलेसह तीन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांच्या खिशात काहीच कागदपत्रे नसल्याने मृतांची ओळख रात्री उशिरा पर्यंत होऊ शकली नाही.

Mypage

पोलिस शेजारील तालुक्यात तपास करण्याचा प्रयत्न करीत होते. ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तीनही मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *