कुस्तीपटू तनिष्कने कोल्हापूरात मारली बाजी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्यातील भातकुडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  इ. ११ वी मधील विद्यार्थी तनिष्क प्रविण कदम याने कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्ष वयोगट, ६५ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकाने दणदणीत विजय मिळवला असून त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

   तनिष्कच्या या यशाबद्दल मा. आ. नरेंद्र पाटील घुले , मा. आ. चंद्रशेखर घुले, माजी . जि. प. अध्यक्षा राजश्री घुले पाटील, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, प्राचार्य घुटे व  भातकुडगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले कदम यास क्रिडा शिक्षक वाकडे,  शिंदे  तसेच पै. युवराज भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.