जिनिंग प्रेसिंग सोसायटीने नवनवीन उद्योग सुरु करून रोजगार निर्मितीवर भर द्यावा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक सहकारी संस्था स्थापन करून सहकाराची बीजे रोवली. सहकारी संस्था चालविताना काटकसर अत्यंत महत्वाची असून त्याचबरोबर संस्थेच्या प्रगतीचा सातत्याने ध्यास घेवून वाटचाल करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जिनिंग प्रेसिंग सोसायटीची प्रगती समाधानकारक असून नवनवीन उद्योग सुरु करून रोजगार निर्मितीवर भर दिल्यास संस्थेची अधिक प्रगती होणार असल्याचा आशावाद आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक सुधाकर रोहोम, शंकर चव्हाण, दिलीप बोरणारे, वसंतर आभाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,

डॉ. शरदचंद्र पवार, पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, संचालक व्यंकटेश बारहाते, अनिल महाले, वीरेंद्र शिंदे, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूसाहेब जावळे, संचालक विजयराव रक्ताटे, देवचंद कडेकर, विजयराव थोरात, मधुकर टेके, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, दिलीपराव शिंदे, विक्रम सिनगर, निवृत्ती शिंदे, संभाजीराव काळे, संस्थेचे व्हा. चेअरमन सुभाष सोनवणे, संचालक सचिन आव्हाड, गणेश गायकवाड, महेश लोंढे, नाना चौधरी, नाना निकम, संजय संवत्सरकर, शंकर गुरसळ, पाराजी गवळी, संदीप शिंदे, शिवाजी शेळके, संतोष वर्पे, विमलबाई गवारे, कांताबाई दहे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, ६२ वर्षापूर्वी कापसाचे पिक मुबलक प्रमाणात घेतले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस उपलद्ध होत होता. शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला योग्य दर मिळून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे जिनिंग प्रेसिंग संस्था स्थापन केली होती. परंतु काळानुरूप झालेल्या बदलामुळे कापूस पिकाचे कमी झालेले प्रमाण व मोठ्या प्रमाणात कापसाची होत असलेली खाजगी खरेदी त्यामुळे जिनिंग प्रेसिंग उद्योग अडचणीत सापडला होता. 

परंतु या अडचणीवर मात करून मागील ३० वर्षापासून कोरुगेटेड बॉक्स तयार करण्याचा शाश्वत व्यवसाय सुरु केल्यामुळे संस्था पुन्हा प्रगतीपथावर आली आहे. व्यापारी संकुल, वजन काटा असे इतर व्यवसाय सुरु असल्यामुळे प्रगती समाधानकारक आहे. मात्र यापुढे जावून रोजगार निर्मितीसाठी नवनवीन उद्योग सुरु करणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.  

प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक मा. आ. अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांचे मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात संस्थेला ७५ लाख ८४ हजार एवढा नफा झाला असून संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे सांगितले. अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर काशिद एस.एन.यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. बी. शेख यांनी केले तर आभार संचालक नाना चौधरी यांनी मानले.