सामान्य शेतकरी कुटुंबातील जयश्री कातकडेचे यश

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ : तालुक्यातील ठाकूर निमगाव येथील अत्यंत सर्वसाधारण शेतकरी कुंटूबतील रमेश कातकडे यांची कन्या जयश्री हिला  सिव्हील इंजिनिअर करण्याच्या आकांक्षेपोटी काष्टीच्या इंजिनिअरींग कॉलेजला टाकले. तीने अतिहाय जिद्दीने बीई सिव्हील उत्तम गुण मिळवून पूर्ण करून शिरूर अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक म्हणून ती कार्यरत झाली. मात्र, दुर्दैवाने कोविडमध्ये वडिल व चुलते रामेश्वर यांचे निधन झाले.

घरातील कर्त्या पुरुषाचेच छत्र हारपल्याने आर्थिक संकट उभे राहिले. यावेळी आई सुमन, भाऊ गणेश व राष्ट्रीय खो-खोपटू नरेंद्र आणि मेव्हणे महादेव पवार यांनी उभारी दिली आणि जयश्रीने त्याचे चिज केले. दरम्यान तीने सरल सेवा अंतर्गत परीक्षा दिली. नुकतीच सार्वजानिक बांधकाम खात्यातील ज्युनिअर इंजिनिअर वर्ग दोन पदी तिची निवड झाली आहे.

जयश्री यावर समाधानी नाही. तीचा स्पर्धा परीक्षेचा सिलसिला चालूच राहणार आहे. शेवगावच्या भूमि कन्या जयश्री कातकडे हीचे या यशा बद्दल आमदार मोनिका राजळे, माजी नगर सेवक महेश फलके, सुभाष बडधे, भाजपा तालुका संघटक महादेव पवार, संभाजी कातकडे, संभा काटे आदिनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशाचे श्रेय आपले चुलते रामेश्वर व वडिल रमेश कातकडे यांना देऊन या यशाच्या काळात कौतुकाची थाप पाठीवर टाकण्यासाठी ते आज आपल्यात नाहीत. उभयतांच्या अकाली निधना मुळे या यशाचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघायचे राहून गेल्याची खंत वाटते. अशी प्रतिक्रीया जयश्री यांनी यावेळी व्यक्त केली आहे.