समता परीवार हेच माझे कुटुंब – सुहासिनी कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : १९७५ साली मी कोयटे कुटुंबात सून म्हणून आले. कोयटे कुटुंब इतके विस्तारलेले आहे की, त्याचे रूपांतर समता परिवारात झाले आहे. समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, समता टायनी टॉट्स, न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूल, स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालय हे कोयटे कुटुंबातील प्रमुख सदस्य आहेत. त्यामुळे माझे फक्त कोयटे कुटुंब नाही, तर समता परिवार हेच माझे कुटुंब असून कुटुंबातील दररोज १२०० सदस्यांचे जेवण बनवण्याची जबाबदारी देखील माझ्याकडे असते. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ६६ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये समता परिवाराच्या कुटुंब प्रमुख सुहासिनी कोयटे आणि समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात त्या मनोगत व्यक्त करताना बोलत होत्या. प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुहासिनी कोयटे यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारी नाटिका सादर केली. नाटिकेद्वारा त्यांच्या जीवनातील चढ – उतार पाहून उपस्थितही भावूक झाले होते. तसेच समता रिडींग डायनामिक्स (एसआरडी) चे उद्घाटन ही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 तसेच समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे म्हणाल्या की, समता परिवाराच्या कुटुंबप्रमुख सुहासिनी कोयटे या माझ्या सासुबाई नसून एक मैत्रीण देखील आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलच्या शालेय परिसरात ३६६ वृक्षांचे वृक्षारोपण उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी समता स्कूल मधील विद्यार्थी घेणार असल्याचा संकल्प देखील समताच्या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने केला असून हा उपक्रम पर्यावरणाचा बिघडलेला असमतोल नियंत्रणात आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक शिक्षकेत्तरांपैकी अनिता आढाव मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, विद्यार्थी आस्वाद मेसमध्ये जेवल्यानंतर घरी आईच्या हातचे जेवण करत नाही. ही पालकांची आमच्याकडे नेहमीच तक्रार असते. त्यांच्या हातच्या रुचकर जेवण बनवण्याच्या कौशल्यामुळे समता स्कूलचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना अन्नपूर्णा ही पदवी बहाल केली.

   या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका डॉ. अंजली पाटील, सी.ई.ओ. सुरेखा लवांडे, लताताई चौधरी, मंगला लोणगावकर, सुमंगल साखरे यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. अहमदनगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती महिला आघाडीच्या सुशिलाताई आंधळकर यांनी कोयटे कुटुंबावर लिहिलेली कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. इतर उपस्थित मान्यवरांनी यथोचित सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता परिवाराचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सांगली येथील महादेव माळी, मंगल माळी, कल्याणी हुरणे, समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्वेता अजमेरे, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, ज्योत्स्ना पटेल, मीना व्यास, सुनंदा भट्टड, किरण डागा, आशालता विभूते, विमल कर्डक, वैशाली जाधव, माजी नगरसेविका दिपा गिरमे, रजनी भुसारे, छाया सोनेकर,

कोयटे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा मोकळ, शिक्षिका तृप्ती कासार, मनिषा कांबळे, स्वप्नाली महिरे, जागृती ठाकूर, छाया ओस्तवाल, नाजमिन अत्तार, सोनाली पवार, त्रिवेणी पवार आदींसह निवारा भजनी मंडळ, कोपरगाव तालुका महिला लिंगायत संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य, नातेवाईक, हितचिंतक व समता परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी मानले.