कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : सिंहस्थ कुंभमेळयाचे प्रमुख मार्गदर्शक ब्रम्हलिन श्री तपोनिधी सदगुरू स्वामी सागरानंद सरस्वती महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व समाधी उत्सर्ग कार्यक्रम श्री १००८ महंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्री १००८ महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २५ ते २७ ऑक्टोंबर दरम्यान श्रीगजलक्ष्मी माता मंदिर तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाडा त्रंबकेश्वर येथे आयोजन करण्यात आले.
सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाणचे शरद थोरात व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, श्री क्षेत्र कोकमठाणचे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या समवेत ब्रम्हलिन सागरानंद सरस्वती महाराज यांनी अनेक वेळा सत्संग सोहळे आयोजित करून रामदासीबाबांचा मोठा सहवास त्यांना लाभला होता.
संपुर्ण भारतात जेथे जेथे सिंहस्थ कुंभमेळयाचे आयोजन व्हायचे त्यात ब्रम्हलिन सागरानंद सरस्वती महाराज यांची भूमिका अत्यंत महत्वपुर्ण असायची. नेवासा येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ डहाळे सर व कोकमठाण भक्त मंडळाने ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या जीवन कार्यावरील कृष्णा गोदाकाठचे योगी, तीनखणीचा रामानुभव, समर्थ विचारधारा ही तीन पुस्तके तयार केली. त्यात सागरानंद सरस्वती महाराजांचे मोठे योगदान होते.
जुना पंचदशनाम आखाडा व अखिल भारतीय षडदर्शन आखाडा त्रंबकेश्वरचे सागरानंद सरस्वती महाराजांनी वयाच्या १८ व्या वर्षापासुन ५० ते ६० वर्षे संपुर्ण भारत भ्रमण करत ज्ञानसंपदा मिळविली. असंख्य तीर्थस्थानांच्या पायी पदयात्रा केल्या. सदगुरू अहंकारी द्वेषी, क्रोधी नसावा, त्याच्याकडे शिष्यांना, भेदभाव करणारी वागणुक नसावी. तो मोहापासून दुर असावा, सदैव ज्ञानग्रहण करून सकलजनांना योग्य मार्गावर नेणारा असावा ही त्यांची कायम शिकवण होती.
सागरानंद सरस्वती महाराजांचे महानिर्वाण ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी झाले होते. त्यांच्या देशभरातील भक्तांनी त्यांचे मंदिर निर्माण कार्य हाती घेवुन पुर्ण केले. सागरानंद सरस्वती महाराजांनी त्रंबकेश्वर येथे वारकरी शिक्षण संस्था सुरू करून असंख्य गरीब निराधार मुलांना संस्काराचे धडे देण्याचे काम केले. २७ ऑक्टोंबर रोजी होणा-या प्राणप्रतिष्ठा सोहळयास पालकमंत्री दादा भूसे, मंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा,
तहसिलदार श्वेता संचेती, पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे, मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, प्रविण अडसरे (त्रंबकेश्वर), रामेश्वर सोनी (मुंबई), मनोहर शिनगारे (जालना). कौशिकभाई जोशी (मुंबई), राहुल जोशी (मुंबई), वैकुठ श्री विश्वनाथ घुगे (नाशिक) यांच्यासह भक्तीधाम कैलास मठाचे महामंडलेश्वर संविधानंद सरस्वती, लातुरचे महामंडलेश्वर सुरेंद्रगिरी, श्रीराम शक्तीपिठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, महंत धनराजगिरी (त्रबकेश्वर), मोर्यानंद सरस्वती (सोलापुर), महंत गिरीजानंद सरस्वती, सोमेश्वरानंद सरस्वती (कन्नड), केशवानंद सरस्वती (परभणी),
सर्वानंद सरस्वती (सिल्लोड), मुक्तानंद सरस्वती (शहापुर), माधवानंद सरस्वती, डॉ. विकासानंद मिसाळ (अहमदनगर) यांच्यासह देशभरातील साधु संत महंत, विविध आखाडे, सन्यासी समाज, आश्रम कुटीयाधारी, वारकरी शिक्षण संस्था आदि मान्यवर उपस्थित रहात आहेत. या सर्व कार्यक्रमाचे पौरोहित्य प्रमोद बाळकृष्ण जोशी गुरूजी, डॉ. पंकजशास्त्री घेवरे गुरुजी करत असुन २६ ऑक्टोंबरला प्रधान देवता हवन तर २७ ऑक्टोंबरला सागरानंद सरस्वती महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.