मराठा साखळी उपोषणाला आमदार काळेचा पाठिंबा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांची आमदार काळे यांनी भेट घेवून पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी स्थगित केलेले उपोषण (दि.२५) पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.

मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जात आहे. कोपरगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला आमदार काळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

यावेळी उपोषणकर्ते अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव, बाळासाहेब जाधव, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, निखील डांगे, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, शैलेश साबळे, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, रविंद्र राऊत, मनोज नरोडे, बाळासाहेब शिंदे, बबलु वाणी, माजी नगरसेवक मंदार पहाडे, आकाश डागा, राजेंद्र जोशी, महेश उदावंत, दिनेश संत आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.