गौतमच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी तिरसे बिनविरोध     

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचेकडील मार्गदर्शक सूचनानुसार बँकेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी संचालक मंडळाबरोबरच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करणे आवश्यक आहे.

प्रथम मंडळाची मुदत संपल्यामुळे नवीन व्यवस्थापन मंडळास रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मान्यता मिळालेली असून सदर व्यवस्थापन मंडळात श्रीकांत तिरसे, राजेंद् ढोमसे, शरद होन, रामराव माळी, अॅड. शिरिष लोहकणे आदी पाच सदस्य असलेल्या व्यवस्थापन मंडळाची पहिली मासिक बैठक शनिवार (दि.२१) रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली.

 सभेत श्रीकांत तिरसे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकद काळे व आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. सदर प्रसंगी बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, व्हा. चेअरमन जावळे, सर्व संचालक मंडळ सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड तसेच सर्व अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.