भोजडे  मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम कौतुकास्पद -विवेक कोल्हे 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : लग्न समारंभावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत एकाच मांडवात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाने आदर्श पायंडा पाडला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

Mypage

          कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सौदागर काकर बिरादरी मुस्लिम समाजाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही बारा जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा सोमवारी पार पडला.  

tml> Mypage

याप्रसंगी या विवाह सोहळ्याचे संयोजक बाबा शेख, सलीम शेख, सदरु शेख, सलीम मुसा शेख, शेहरू शेख, मोहसीन सय्यद, बद्रुद्दीन शेख, सिकंदर शेख, इब्राहिम शेख, गुलाब शेख, जावेद शेख, कय्यूम शेख, सलीम शेख, बाबा कालू, जाफर मकबूल, अकबर करीम, इब्राहिम भाई, हसन भाई, ज्ञानेश्वर सिनगर, संजय सिनगर, कैलास धट, रंगनाथ सिनगर, शामराव गिरे, बाळासाहेब सिनगर, पवन सिनगर, नानासाहेब सिनगर, वाल्मिक बोऱ्हाडे, रवींद्र मंचरे, विकास बोर्डे, संतोष बोर्डे, बाबासाहेब बोर्डे, सतीश शेटे, श्रावण बोर्डे, अशोक सिनगर, दीपक मंचरे, प्रमोद सिनगर, सचिन सिनगर, सचिन घनघाव, बाबासाहेब सोनवणे, बाजीराव सिनगर आदींसह मुस्लिम समाजबांधव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

   विवेक कोल्हे म्हणाले की, भोजडे येथील मुस्लिम समाज अतिशय कष्टाळू समाज आहे. लहान-मोठे उद्योगधंदे करून हा समाज उपजीविका करतो. भोजडे गाव सर्वधर्मसमभाव जोपासणारे  आहे. तालुक्यातील अन्य गावातील मुस्लिम बांधवांनी धोत्रे सामुदायिक विवाह सोहळ्याचे अवलोकन करावे असे आवाहन त्यांनी केले.

Mypage