गंगामाई साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन
शेवगांव प्रतिनिधी, दि. २७ : या हंगामामध्ये पाऊस कमी असल्यामुळे उसाचे लागवड क्षेत्रात घट झाली. असून ऊस उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. मागील दोन्ही हंगामामध्ये उस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे वेळेत गाळप केले. या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील.
आपल्या कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वानी आपला ऊस गंगामाई कारखान्यास देऊन सहकार्य करावे. असे आवाहन करून गंगामाई परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देईल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी जाहीर केले. तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याचा १३ वा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक रणजीत मुळे, संचालक समिर मुळे, पार्थ मुळे यांचे उपस्थितीत मुख्य शेतकी अधिकारी वैशाली संदीप मनाळ यांचे शुभहस्ते गव्हाण व मोळीची विधिवत पूजा करून संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या वेळी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. व्हाईस प्रेसिडेंट व्हि.एस. खेडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी विलास ढोरकुले, विष्णुपंत घनवट, बाभूळगावचे सरपंच संभाजी घनवट, राजू गर्जे, मच्चीन्द्र ढोरकुले, संजय टाकळकर, रणजित घुगे, प्रकाश घुगे, मदन मोटकर, संदीप मोटकर, कुंडलिक घुगे, कृष्णा ढोरकुले, डेव्हिड गंगावणे, सुरेश कटारिया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे, अमोल देवढे, मेजर अशोक भोसले, शिवाजी साबळे, लक्ष्मण टाकळकर, बबन खेडकर, उपस्थित होते.