कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपुरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल मानकापुर, नागपुर येथे नुकतीच पार पडली. यात १७ वर्षा खालील वयोगटात संजीवनी अकॅडमीचा अष्टपैलु खेळाडू साई भागवत याची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली, अशी माहीती संजीवनी अकॅडमीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
ग्रामीण विद्यार्थाना जागतिक दर्जाचे शिक्षण देवुन त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठीची तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची असायची. वयाच्या ९३ व्या वर्षीही ते रोज सकाळी स्कूल मध्ये जावुन तेथिल कामकाजाची आणि विद्यार्थाना प्रगतीची माहिती घ्यायचे.
त्यांनी घालुन दिलेली शैक्षणिक आचारसंहिता स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे ह्या संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेत आहे. यामुळे संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थी देश पातळीवर सुध्दा वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन कीर्तिमान स्थापित करीत आहेत.
साई भागवतची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर डॉ. कोल्हे यांनी साईला प्रशस्तीपत्र देवुन सत्कार केला. यावेळी प्राचार्या शैला झुंजार व क्रीडा प्रशिक्षक सुजय कल्पेकर उपस्थित होते. साई आता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अक्षय येवले, सुजय कल्पेकर व क्रीडा विभाग प्रमुख विरूपक्ष रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे. या स्पर्धा राजस्थान मधिल बिकानेर येथे होणार आहे.