शारीरिक मजबुतीसाठी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : मैदानी खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. बहुतांशी मैदानी खेळ हे सांघिक प्रकारचे असल्याने त्यातून सांघिक भावना आणि आत्मविश्वास वाढीस लागतो तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देखील बळकट होते. त्यामुळे मैदानी खेळ खेळणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावाच्या दौऱ्यावर असताना विवेक कोल्हे यांनी तेथील शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या व्हॉलीबॉल ग्राऊंडवर युवकांच्या आग्रहास्तव भेट देत खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच प्रोत्साहन दिले. शिवसूत्र युवा प्रतिष्ठानने आपल्या सामाजिक कार्यातून तालुक्यामध्ये वेगळा ठसा उमटविला असून, प्रतिष्ठानने मैदानी खेळातून युवकांचे उभारलेले संघटन हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

विवेक कोल्हे म्हणाले, मैदानी खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबर बौद्धिक विकासही होतो. मैदानी खेळ खेळल्याने एकाग्रता निर्माण होते. नेतृत्वगुण विकसित होतात. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. सध्याच्या आधुनिक युगात जीवनशैली बदलत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मैदानी खेळ लोप पावत आहेत. तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी जात आहे.

युवक खेळांपासून दूर चालले आहेत. त्यांच्यात खेळाची आवड निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तरुणांना शारीरिक आणि मानसिक व्याधीपासून दूर ठेवण्यासाठी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मैदानी खेळांना आणि हा खेळ खेळणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील मारुती मंदिर येथे नियमितपणे सायंकाळी व्हॉलीबॉल खेळ खेळला जातो, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी आरपीआय (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी वक्ते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, भाजप युवा मोर्चा कोपरगाव तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, कोंडीराम वक्ते, रामभाऊ वक्ते, हनुमंत मेहेत्रे, बारकु मेहेत्रे, भास्कर गायकवाड, भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष सुमित पगारे, किशोर गायकवाड, संदीप राऊत, राहुल वक्ते, शशिकांत वक्ते,

ऋषिकेश वक्ते, गौतम गायकवाड, अभिजीत गुरसळ, सागर गुरसळ, रघुनाथ गुरसळ, किरण गुरसळ, बंटी मेहेत्रे, कैलास जोर्वे, शरद चव्हाण, सुधाकर चव्हाण, साईनाथ वायकर, राहुल देवकर, लाला गांगुर्डे, सुनील वक्ते, राजेंद्र वक्ते, अक्षय चव्हाण, संजय गुरसळ, लहानु गायकवाड, बलवीर गरूड, गौरव पवार, गौरव गुरसळ, सौरव वक्ते, अजय गुरसळ, प्रसाद सोळके, सुरज चव्हाण, सौरव पवार, कार्तिक मेहेत्रे, नीलेश शिंदे, रवी पवार, अजय गोरसे, पिनु पवार, अवी पगारे, पप्पू गायकवाड, सागर गायकवाड आदींसह युवा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.