आण्णासाहेब निवृत्ती बोरावके यांचे निधन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सकाळी उठल्या पासुन राञी झोपे पर्यंत दिसेल त्याला राम राम घालुन आपली संस्कृती जपणारे विनयशील व्यक्तीमत्व आण्णासाहेब निवृत्ती बोरावके वय ७२ वर्षे यांचे  बुधवारी दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने शहरातील मुळे हाॅस्पिटल येथे उपचारा दरम्यान  निधन झाले.

Mypage

स्व.आण्णासाहेब बोरावके यांनी अखेरचा राम राम घालुन अचानक जगाचा निरोप घेतल्याने कोपरगाव मध्ये सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. स्व आण्णासाहेब निवृत्ती बोरावके यांच्या पाश्चात्य त्यांची पत्नी, जेष्ठ मुलगा निलेश आण्णासाहेब बोरावके, मुलगा नितीन आण्णासाहेब बोरावके, मुलगी वैशाली शहाजी जेडगे, पुतण्या राजेंद्र हरिभाऊ बोरावके, पुतण्या सचिन हरिभाऊ बोरावके यांच्यासह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  

tml> Mypage

कोणताही भेदभाव मनी न ठेवता सर्वांना नित्याने राम राम घालणारे स्व. आण्णासाहेब बोरावके यांनी बुधवारी अखेरचा राम राम घालुन या जगाचा निरोप घेतल्याची भावना अनेकांनी व्यक्त करीत स्व. बोरावके यांच्या निधनाबद्दल आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, महानंद दूधचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भारत दूर संचार निगमचे अध्यक्ष रविंद्र बोरावके यांच्यासह विविध क्षेञातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Mypage