बाळासाहेब चौधरी यांचा बुधराणी हॉस्पीटलमध्ये सन्मान

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : श्री क्षेत्र अमरापूरचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी गेल्या तीन वर्षा पासून शेवगाव रोटरी क्लबच्या माध्यमातून व पुण्याच्या बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने राबविलेल्या “अंधमुक्त व्हिलेज” या उपक्रमाद्वारे करत असलेल्या कार्याबद्दल त्यांना नुकतेच पुण्याच्या साधु वासवाणी मिशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने पुणे येथे बुधराणी हॉस्पीटलमध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बुधराणी हॉस्पीटलचे अॅडमिन हेड रोहित वाघ, मार्केटिग हेड प्रकाश धर्माधिकारी, प्रोजेक्ट मॅनेजर गिरीष पाटोल उपस्थित होते. वाघ  म्हणाले, चौधरी यांनी “अंधमुक्त व्हिलेज” या संकल्पनेतून बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने सलग तीन वर्षे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मधील अनेक गावामध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे घेऊन हजारो अंधांना दृष्टी दिली.

तसेच बुधराणीच्या “अंधत्वातून दृष्टीकडे” या संकल्पनेसाठी विशेष योगदानाबद्दल साधु वासवाणी मिशन यांनी रो. बाळासाहेब चौधरी (डिस्ट्रिक्ट चेअरमन कम्युनिटी सर्व्हिस) यांचे कामाची पुरस्कारासाठी दखल घेतली आहे.