दिव्यांगांना त्रास देणाऱ्यास दोन वर्षाची शिक्षा – न्या. जागूष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुका विधी सेवा समिती, शेवगाव वकील संघ, पंचायत समिती शेवगाव तसेच सावली दिव्यांग संस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  पंचायत समिती मध्ये आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

       अध्यक्ष स्थानी शेवगावच्या प्रधान. न्या. संजना जागुष्टे होत्या. यावेळी न्या. व्ही बी डोंबे सह दिवाणी न्यायाधीश, न्या. एम. ए. बेंद्रे सह दिवाणी न्यायाधीश. गटविकास अधिकारी राजेश कदम, वकील संघांचे विधिज्ञ अविनाश शिंदे, विधिज्ञ अभिषेक इखे, विधिज्ञ संभाजी देशमुख, विधिज्ञ मुनाफ शेख, कोर्ट कर्मचारी श्रीमती मनीषा खीलारी,  विस्तार अधिकारी सचिन भाकरे, सावली दिव्यांग संस्थेचे चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, मनोहर मराठे,खलील शेख, अनिल विघ्ने, बाबासाहेब गडाख, गणेश महाजन, सुनिल वाळके, किशोर अंगरख, गणेश तमानके, अंजली खरात, रजिया शेख, चंद्रकला काळे, सकू मिसाळ, वंदना तुजारे, निलोफर शेख उपस्थित होते.

       कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना न्या. जागुष्टे यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क व अधिकार बाबत कायदेविषयक दिव्यांग कायदा १९९५ बाबत मार्गदर्शन करत सदर कायद्यात ज्या उणीवा राहिल्या होत्या त्या उणीवांची छाननी करून दिव्यांग व्यक्ती हक्क व अधिकार अधिनियम २०१६ बाबत सखोल माहिती दिली. तसेच १९९५च्या कायद्याने दिव्यांगाचे ७ प्रवर्ग होते. आता २०१६ च्या कायद्याने २१ प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच बरोबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वं दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.

   गटविकास अधिकारी कदम यांनी दिव्यांग बांधवांना मोदी आवास योजनेत प्राधान्य दिले जाईल तसेच रोजगारासाठी बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड करून मनरेगा अंतर्गत रोजगाची संधी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच दिव्यांग ५% टक्के निधी शंभर टक्के खर्च करण्यात येईल याची ग्वाही दिली.

       सरकारने दिव्यांग व्यक्तीना व्यवसायासाठी हरीत उर्जेंवर चालणारे वाहन देण्याची घोषणा केली असून दिव्यांग बांधवानी ऑनलाईन अर्ज भरून सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सावली दिव्यांग संस्थेचे राज्य उपाध्यक्ष चांद शेख यांनी यावेळी केले.