श्रीगणेशच्या साईची राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : शालेय क्रीडा विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भालाफेक या खेळामध्ये श्री गणेश शिक्षण शिक्षण संस्थेचा साई उदावंत या विद्यार्थ्याने आपल्या खेळाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्याची १७ वर्षे वयोगटात भालाफेक या खेळासाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गडचिरोली येथे निवड झाली आहे.

  पुणे येथे झालेल्या विभागस्तरीय भालाफेक स्पर्धेत साई याने ४५.१६ मीटर लांब भाला फेकून आपली उमेदवारी राज्यासाठी निश्चित केली. श्री गणेश शैक्षणिक संकुलाच्या दोन विद्यार्थ्यांनी एकाच शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यस्तरावर मजल मारली आहे. हि आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे यांनी दिली.

          साईच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल, महावीर शिंगवी, देविदास दळवी, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, उपप्राचार्य प्रवीण दहे, प्रा.सागर हिंगे, प्रा.योगेश फटांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी अभिनंदन केले.या खेळाडूला क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व रवींद्र मोगल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.