शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : साई सर्व्हिस, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन व कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१६) शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व आरोग्य शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी माजी आ. डॉ.नरेंद्र घुले, मा.आ. चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ.क्षितीज घुले, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन लि.अहमदनगरचे विक्री अधिकारी अमितकुमार राय व प्रादेशिक अभियंता रविराज दास यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.आ.पांडुरंग अभंग होते. त्यांनी शेतकऱ्यांना घटत चालेले शेती उत्पादन, नैसर्गिक आपत्ति, अवकाळी, पाण्याचे कमतरता, इ. शेतकर्यांना येणार्या समस्या बाबतीत सरकारची धोरणे व शेतीचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले. भारत पेट्रोलीयमचे अमितकुमार राय यांनी दहिगाव-नेच्या साई सर्व्हीस पेट्रोल पंपाला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट पूर्ण डिजिटल ऑटोमेशन पेट्रोल पंप म्हणून मानांकन मिळाल्याचे जाहीर केले.
तसेच या ठिकाणी सर्व ग्राहकांना शुद्धतेची हमी (प्यूअर फॉर शुअर) असल्याचे सांगितले. कंपनी तर्फे शेतकरी व ग्राहकासाठी पुरवल्या जाणा-या विविध सुविधा उत्कृष्ट गुणवत्तेचे असल्याबाबत साई सर्व्हिसचे अभिनंदन केले. त्याच बरोबर कृषी संकल्पनेच्या बाबत सर्व शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच केव्हीके दहिगाव-ने चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्यामसुंदर कौशिक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शाश्वत शेती उत्पादन कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी रविंद्र मोटे, ह.भ.प.नवनाथ महाराज काळे, ह.भ.प.वैभव महाराज, इंडो फार्म ट्रॅक्टरचे मिलिंद पाटील, प्रदीप नजन, तुषार आव्हाड, अमोल शेळके, आरोग्य अधिकारी डॉ.धंनजय ठोकरे व सर्व कर्मचारी, जिजामाता नर्सिंग स्कूल दहिगाव-ने चे प्राचार्य व सर्व कर्मचारी तसेच कृषि विज्ञान केंद्राचे सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, डॉ.प्रवीण देशमुख, वैभव नगरकर व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान परिसरातील कापूस, ऊस, अद्रक, इत्यादी पिकाचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी शंकर जाधव, गणेश जगदाळे, बाबासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर धोंडे, वैभव माळवदे, संभाजी गवळी, तुकाराम चव्हाण यांचा साई सर्व्हिसच्या वतीने सन्मान करण्यात आला. आरोग्य शिबीरात हजारावर शेतकर्यांनी आरोग्य तपासणी व कृषि प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रा.मकरंद बारगुजे, प्रा.बाळासाहेब मंडलिक यांनी सूत्र संचालन केले तर कृषि विज्ञान केंद्राचे इंजि.राहुल पाटील यांनी प्रास्ताविक व माणिक लाखे यांनी आभार मानले.