कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कोपरगाव शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर आ.आशुतोष काळे यांनी भर दिला आहे. त्यामाध्यमातून कोपरगाव शहराबरोबरच शहरालगत असणाऱ्या विविध उपनगरातील हद्दवाढ झालेल्या भागातील विकास कामांना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून या निधीतून १० कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यानी दिली आहे.
कोपरगाव शहराच्या विकासाला आ.आशुतोष काळे यांनी चालना देवून पाणी, रस्ते, शहर सुशोभीकरण, आरोग्य आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांना बरोबरच उपनगरातील व हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना देखील अपेक्षित असलेला विकास व्हावा यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. त्यासाठी शासन दरबारी विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करून या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराच्या १० कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये कोपरगाव नगरपरिषदेच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागातील नाईक नगर मधील रस्ते व गटार बांधकाम करणे २१.९९ लक्ष, सह्याद्री कॉलनी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे २१.९९ लक्ष, द्वारकानगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ८५.९९ लक्ष, शंकरनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे १.४८ कोटी, ब्रिजलाल नगर भागातील रस्त्यावरील सि.डी. वर्क सह गटार बांधकाम करणे ७७ लक्ष, आदिनाथ सोसायटी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ३२.९९ लक्ष,
गोकुळनगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ५० लक्ष, शंकरनगर भागातील पवारवस्ती भागात रस्ते व गटार बांधकाम करणे १.०९ कोटी, ओमनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे १.२९ कोटी, गवारेनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे१.३९ कोटी, गवारे वस्ती भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ५० लक्ष, आयोध्या नगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे २० लक्ष, धोंडीबा नगर-हनुमान नगर-पवार वस्ती रस्ते व गटार बांधकाम करणे १.१० कोटी अशा एकूण जवळपास १० कोटीच्या कामांचा समावेश आहे.
या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन विकास कामांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे आ.आशुतोष काळे यांच्यामुळे पूर्ण होणार आहे. त्याबद्दल कोपरगावच्या नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.