कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे कर्मचारी तसेच कारखाना परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेला अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गेलेक्सी इन्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा पतसंस्था विभागातील बँको पतसंस्था ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी स्थापन केलेल्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला आहे. संस्था नेत्रदीपक प्रगती करीत असून दिवसेंदिवस संस्था प्रगतीच्या सर्वोच्च शिखराकडे झेपावत आहे.
या प्रगतीची दखल घेवून सन २०२३ चे गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय काम केल्याबद्दल पतसंस्था ठेवी ३५ कोटी ते ४० कोटी या पतसंस्था विभागात बँको पतसंस्था ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मॅनेजर व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी दमण येथे पद्मविभुषण डॉ. शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मॅनेजर मंगेश देशमुख यांनी दिली आहे.