बचत गटाच्या महिलांना पाठबळ देणारा गोदाकाठ महोत्सव राज्यासाठी आदर्शवत – ना. आदिती तटकरे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे दरवर्षी होत असलेल्या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे बचत गटाच्या महिलांना पाठबळ मिळत असून बचत गटाच्या महिलांना पाठबळ देणारा ‘गोदाकाठ महोत्सव’ राज्यासाठी आदर्शवत असल्याचे गौरवद्गार राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांनी काढले आहे.

Mypage

सालाबाद प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या गोदाकाठ महोत्सवाला राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसिंग द्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देणे हा महिला आर्थिक विकास महामंडळाचा अर्थात मविमचा खरा उद्देश आहे. आणि हा उद्देश गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून साध्य होत आहे.

Mypage

याचा मला राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री या नात्याने व मी देखील एक महिला असल्याने मला अभिमान वाटतो. बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘गोदाकाठ महोत्सव’ अतिशय समर्थपणे आपली  जबाबदारी पार पाडीत असून या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. गोदाकाठ महोत्सव २०२४ च्या आयोजनात महिला व बालविकास विभाग देखील अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Mypage

आ. आशुतोष काळे यांनी गोदाकाठ महोत्सवात बचत गटाच्या शेकडो महिलांनी तयार केलेली उत्पादने विक्री करण्यासाठी अल्प दरात स्टॉल उपलब्ध करून दिले यामागे बचत गटाच्या महिलांचे एक प्रकारे हित जोपासले जात आहे. मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधतांना आ. आशुतोष काळे महिलांसाठी गोदाकाठ महोत्सवा सारखे असे विशेष उप्रकम राबवून महिलांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी करीत असलेल्या कामाचा मनस्वी आनंद होत आहे. ना.अदिती तटकरे.

महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, महिला बालविकास अंतर्गत राबवली जाणारी लेक लाडकी योजना, उमेद आणि मविमच्या बचत गटांना दिले जाणारे अर्थ सहाय्य, त्यांचे वेगवेगळे स्टॉल्स याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

Mypage

गोदाकाठ महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले असल्यामुळे ग्रामीण भागातील नवोदित कलाकार उदयास येणार आहे. महिला बचत गट ज्यामध्ये उमेद, मविम व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचे बचत गट असतील यांना विक्री करण्यासाठी या माध्यमातून एक केंद्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असल्याचे देखील महिला बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

Mypage