डॉ. विलास निकम यांना जळगाव विद्यापीठाची पीएचडी

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ :  संदिप फाऊंडेशनचे उपप्राचार्य डॉ. विलास नवनाथ निकम यांना जळगाव विद्यापीठाने पी.एचडी प्रदान केली आहे, ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी व रांजणगाव देशमुख येथील रहिवासी हौशीराम गोर्डे यांचे जावई आहेत. 

Mypage

प्रा. डॉ. विलास नवनाथ निकम यांनी सिव्हील इंजिनियरींग मध्ये शिक्षण पूर्ण केले असून डॉ. विद्या सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर रिसोर्स या विषयावर संशोधन करून त्याबाबतचा प्रबंध जळगाव विद्यापीठास सादर केला होता. प्रा. डॉ. विलास निकम व त्यांच्या पत्नी प्रा. स्नेहल निकम (एम.ई. ई. अँड टी. सी) हे दोघेही संदिप फाऊंडेशन नासिक येथे नोकरीस आहेत. 

Mypage

प्रा. डॉ. विलास निकम यांना मिळालेल्या पी.एचडी. बद्दल संदिपकुमार झा, प्रो. जे. जी. नायक संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.

Mypage