स्त्री सन्मानाने घराघरात सुख-शांती नांदते – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : स्त्री ही अन्नपूर्णा असते. ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जातो, आदर केला जातो त्या घरात सुख-शांती सैदव नांदत असते. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म तर अर्थमंत्री निर्मला सीरातम आहेत. म्हणजे आई सरस्वती आणि आई लक्ष्मीच्या रुपात देशाचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्त्रियांचा मान-सन्मान राखला पाहिजे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

विवेकानंदरनगरमधील बालाजी आंगण येथे अयोध्येत झालेल्या रामलल्ल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामलल्लांचे स्वागत करण्यासाठी अभिनव प्रतिष्ठान व अभिनव महिला प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात कोल्हे बोलत होत्या. पाचशे वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षनेतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर झाले. रामलल्ला तेथे प्रस्थापित झाले. हा दिवस म्हणजे अनेकांची स्वप्नपूर्ती कणारा दिवस आहे.

त्यामुळे आज देशवासियांनी दिवाळी साजरी केली. मंदिर उभारण्ंयासाठी ज्या कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना अभिवादन करून कोल्हे म्हणाल्या की, अभिनव प्रतिष्ठानने रामलल्लांच्या स्वागताचा कार्यक्रम अतिशय सुंदर केला. विशेषतः महिलांनी ज्या उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला ते पाहून उर्जा निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. पंतप्रधान देश उभारणीच्या कामात करत असलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला. 

कॉलनी सजली-धजली रामलल्लाचे स्वागत करण्यासाठी कॉलनीत असलेल्या गणपती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. सर्व परिसर भगव्या पताकांनी सजला होता. महिलांनी मिरवणुकीच्या मार्गावर सुंदर रांगोळ्या काडून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. शेकडो हाताच्या मदतीने रामलल्लांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

प्रारंभी अभनिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कडू यांनी मा.आ. कोल्हे यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. महिलांनी सादर केलेल्या भजनात कोल्हे उत्साहाने सहभागी झाल्या. प्रतिष्ठानच्या वतीने कॉलनीतील जोशी दाम्पत्य यांना होळकर घराकडून मिळालेल्या रामलल्लांच्या मूर्तीची राम मंदिरारापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.

पुरुषांसह महिलांनीही डोक्यावर बांधलेल्या फेट्यांनी व कपाळभर लावलेल्या गंधाने मिरवणुकीची शोभा वाढवली. सियावर रामचंद्र की जय, जयजय श्रीराम व भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संध्याकाळी प्रभू श्रीरामाची सामूहिकरित्या आरती करण्यात आली. त्याननंतर कॉलनीतील महिला व पुरुषांच्यावतीने रामरक्षा व हनुमान स्त्रोत्राचे पठण करण्यात आले. आलेल्या सर्व रामभक्तांना लापशी, डाळबट्टीचा महाप्रसाद देण्यात आला. अभिनव प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांसह घरा-घरातील प्रत्येकाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.