कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत एक वचनी एक बाणी प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारून जगात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्याची आठवण ठेवत तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ग्रामस्थांनी श्रीरामसृष्टी निर्माण करण्याचे काम सुरू केले ते विरकालाची आठवण ठरणार असल्याचे प्रतिपादन हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुका हा ऐतिहासिक पौराणिक असुन असंख्य संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. राजा दशरथला प्रभुश्रीराम पुत्ररत्न प्राप्त व्हावा. त्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे जनक श्रीक्षेत्र संवत्सर येथील विभांडक ऋषींचे चिरंजीव शृंगेश्वर आहे. त्यांच्या हातुन झालेले कार्य फळाला आले आणि या भूतलावर प्रभुरामचंद्राचा जन्म झाला.
अयोध्येतील श्रीराममंदिराचा प्रश्न पाचशे वर्ष अडगळीत पडला होता, परंतु संपुर्ण जगातील रामभक्तांच्या चेतनेतुन २२ जानेवारी रोजी अयोध्येत दिमाखात मंदिर उभे राहिले त्यात बेलापूर श्रीरामपुरचे महंत गोविंदगिरी यांचाही मोलाचा सहभाग राहिला हा देखील एक इतिहास आहे.
चासनळीतील श्रीरामसृष्टीचे औचित्याच्या निमीत्ताने महामंडलेश्वर शिवानी माताजी, महंत राघवेश्वरानंद महाराज, हभप रघुनाथ महाराज खेडले संथान, महंत गोवर्धनगिरी महाराज, अजय सरस्वती महाराज, संतोष महाराज, निहालगिरी महाराज, विकास महाराज, जयशंकरगिरी महाराज आदिंचा यथोचीत सत्कार करण्यात आला.