कोपरगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी पाच जखमी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधीतून आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लहान मुलांसाठी खेळणी दिले आणि वादाला सुरुवात झाली. अखेर रविवारी सायंकाळी दोन गटात खेळण्यावरून लहान मुलांमध्ये भांडण झाले त्याचे रूपांतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात पाचजन जखमी झाले, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, गांधीनगर येथील मोकळ्या जागेत शंकर गार्डनची निर्मिती खासदार लोखंडे यांच्या पार्टीच्या पदाधिकाऱ्याने केली. खासदार निधीतून लहान मुलांसाठी विविध खेळणी बसवले. माञ गांधीनगर येथे हिंदू – मुस्लिम दोन्ही समाजाची लोक राहतात त्यामुळे तिथे खेळण्यावरून दोन गटात वाद होणार असल्याने ती खेळणी तेथुन हटवण्याची मागणी त्या प्रभागाचे नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी गेल्या अनेक दिवसांपासून करीत होते.
त्यांनी २४ जानेवारी रोजी त्या बद्द्ल उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर रविवारी सायंकाळी खेळण्यावरून लहान मुलांचे भांडण झाले त्यात मोठ्यांनी उडी घेतली. शाब्दिक बाचाबाचीतून तोशिब अकील पठाण याला समोरच्या गटातील एकाने विट फेकून मारली. डोक्याला विट लागल्याने जखमी झालेल्या तोशीफ पठाणला जवळच्या आचारी हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आचारी हाॅस्पिटल येथे वादावर तोडगा काढून आपसात मिटवा मिटव करत असताना पुन्हा बाचाबाची झाली आणि बघता बघता तलवारी, कोयते, दांडे काढून मारहाण सुरू झाली. उपचार घेणारा तोशीफ पुन्हा काही झालं का म्हणून पहाण्यासाठी बाहेर आला असता जमावातून कोणीतरी पुन्हा त्यांच्यावर शस्ञाने डोक्यावर वर्मी घाव घातले. तोशीफ अकील पठाण वय २४ रा. गांधीनगर हा गंभीर जखमी झाला तर त्याच्या सोबतचे शोयब करीम शेख२५, मतिन झाकीर सय्यद २२, अरशद अमिन पठाण १७, आवेस मुश्ताक शेख वय १७, हे सर्व राहणार गांधीनगर हे जखमी अवस्थेत आचारी हाॅस्पिटल मध्ये घुसले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून रक्ताबंबाळ झालेल्यांना डॉ. विलास आचारी, डॉ. अभिजीत आचारी, डॉ.दिपाली आचारी व डॉ. सुश्मा आचारी या दांपत्याने तातडीने उपचार सुरु करून पुढील धोका टाळता जीवदान दिले. तर तोशीफ पठाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी एस जे एस रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान जखमी झालेल्यांनी माहिती देताना म्हणाले की, सुरुवातीला चार ते पाच जन मोटारसायकल वरून आले आणि मारहान सुरू केली त्या नंतर ३० ते ४० जनांच्या टोळीने येवून किरकोळ कारणावरुन मारहान केल्याने आम्ही जखमी झालो असल्याचे सांगितले.
घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. त्या परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असुन राञी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करून मारामारी करणाऱ्याची धरपकड सुरु केली आहे.
डॉ. अभिजीत आचारी यांच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. आचारी हाॅस्पिटल समोर मारामारी सुरू झाली. काही तरुन हाॅस्पिटलच्या फाटकात घुसले. मोठमोठ्याने आरडाओरड सुरु झाल्याचे पाहून डॉ. अभिजीत आचारी व डॉ. दिपाली आचारी यांनी तातडीने हाॅस्पिटलचे मुख्य फाटक बंद करुन घेतले. त्यामुळे फाटकाच्या आत बंदीस्त झालेले अनेक तरुण या हल्ल्यातून बालंबाल बचावले. अन्यथा मोठी घटना घडली असती अशी माहीती डॉ. अभिजीत आचारी यांनी दिली. मारामारीचे काही दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.