नियमित आरोग्य तपासणी गरजेची – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : धावपळीच्या जीवनामध्ये स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कोणत्याही आजाराला सहजपणे न घेता भविष्यातील मोठ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येवू नये यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यंत गरजेची असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील समाज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार काळे पुढे म्हणाले की, दगदगीच्या जीवनात आरोग्याची हेळसांड होत असल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होवून विविध आजार जडले जातात. या आजारांचे लवकरात लवकर निदान होवून त्या आजारांवर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा आजारांमुळे वेळप्रसंगी जीवाला धोका देखील निर्माण होतो.

त्यामुळे असे संभाव्य धोके टाळण्यासाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर स्तुत्य उपक्रम आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांचा  जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेवून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मोफत आरोग्य तपासणी शिबिर उपक्रमाचे संजयनगर भागातील नागरिकांनी उत्साहाने स्वागत करून शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रमेशजी गवळी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, राजेंद्र आभाळे, धनंजय कहार, सचिन गवारे, शिवाजी कुऱ्हाडे, चंद्रकांत धोत्रे, हारुण शेख, रोशन शेजवळ, विशाल गुंजाळ, बाळासाहेब गायकवाड, देवराम पगारे, राहुल कालेकर, सोमनाथ रोठे, किरण गुंजाळ, प्रकाश गायकवाड, गणेश कुऱ्हाडे, भाऊसाहेब रोठे, राहुल रोठे, संजय गुंजाळ, 

कालिदास नाईकनवरे, आण्णा धोत्रे, दिलीप आभाळे, नंदू कोपरे, महेश रक्ताटे, रवी बिडवे, तुषार कोतकर, सुनील गायकवाड, मनीषा सपकाळ, अमोल देशमुख, पायल बागुल, वैभवी होन, प्रियंका डोईफोडे, सपना ढोबळे, शितल गव्हाणे, पंकज जोशी, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या डॉ. सायली ठोंबरे, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. पठाण, डॉ. कुलकर्णी, डॉ. मेहरबानसिंग आदींसह नागरिक उपस्थित होते.