राहुरीच्या साखळी उपोषणाला कोपरगाव वकील संघाचा पाठींबा

अॅडव्होकेट प्रोटेक्षन अॅक्ट लागु करण्याबाबद मुबंई येथे उपोषण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उपोषण करण्यात येत आहे. त्यास कोपरगाव संघाने देखिल साखळी उपोषण करून राहुरीकरांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे.

दि.25 जारेवारी 2024 रोजी अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिशा मनिषा या पती-पत्नीचा निघृण खुन करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ जिल्हाभर दि.29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निणर्य वकील संघटनांनी घेतलेला आहे. त्यामुळे कोपरगाव न्यायालयामध्ये देखिल शुकशुकाट पहायला मिळत आहे.

दरम्यान वकील संघाच्यावतीने कोपरगाव न्यायालय आवारात मंडप टाकुन साखळी उपोषण करीत राहुरीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. सदर साखळी उपोषण 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालु राहणार असुन वकीलांच्या न्याय हक्कासाठी अशीच एकजुट दाखवली जाईल. दरम्यान उपोषणस्थळी वकील संघटनेच्या पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदविला.

यावेळी सदर खटला जलद न्यायालयात चालवावा, प्रलंबित असलेला अॅडव्होकेट प्रोटेक्षन अॅक्ट लवकरात लवकर आमलात आणावा, गुन्हयाचा तपास व्यवस्थीत आणि पारदर्शक व्हावा आदी मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.

राहुरीच्या घटनेकडे दुर्लक्ष केल्यास वकील बांधवांना काम करणे अवघड होईल. त्यामुळे अॅडव्होकेट प्रोटेक्षन अॅक्ट लागु करण्याबाबद शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुबंई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्रतील हजारोंच्या संख्येने वकील बांधव दि.2 फुेब्रुवारी 2024 रोजी उपोषण करून महाराष्ट्र शासन व माहाराष्ट्र व गोवा बार कौसिंलच्या अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यात कोपरगाव बारचे सदस्यही सामिल होणार आहेत. अशी माहिती वकील संघाचे वतीने देण्यात आली.

दरम्यान कोपरगाव वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी राहुरी बारला भेट देत राहुरी बारच्या साखळी उपोषणाला पाठींबा दिला. हा पाठींबा कायम ठेवण्यासाठी कोपरगाव न्यायालयाच्या आवरात देखिल साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. यामध्ये असंख्य सिनीअर व ज्युनियर वकील सदस्यांनी उपोषणात सहभाग नोंदविला. यावेळी अॅडव्होकेट प्रोटेक्षन अॅक्ट लागु झालाच पाहीजे, वकीलांना संरक्षण मिळालेच पाहीजे अशा घोषणा देत राहुरी घटनेचा निषेध व्यक्त केला.