अनुवाद ही ज्ञान साहित्य सर्वांपर्यंत पोहचवण्याची कला – प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : भारतीय परंपरेचा स्वीकार न करता पाश्चात्य संकृतीचा प्रभाव शिक्षणव्यवस्थेत जास्त दिसून आला आणि तीच चिंतनीय बाब आहे आणि अनुवाद हे एक प्राचीन ज्ञान परंपरा सर्वांपर्यंत पोहचवायचे एक माध्यम आहे असे मत नवी दिल्ली शिक्षा मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय हिंदी संस्थान आगरा तथा केंद्रीय हिंदी निदेशालयाचे निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय ज्ञान परंपरा और अनुवाद” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय संगोष्टीच्या आयोजनात बोलत होते. यावेळी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष शीतला प्रकाश दुबे यांनी आधुनिकता आणि परंपरा यांच्यातील सांगड कशी घालावी लागते याबद्दल मार्गदर्शन केले.

या संगोष्टीचे बीजभाषण पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी भारतीय समाजिक शास्त्र आणि भौगोलिक शास्त्रातील ज्ञान परंपरा सांगून उपनिषदामधील संवाद कौशल्याचा प्रभाव आणि संवाद हे मातृभाषेत प्रभावीपणे होऊ शकतात. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेत शिक्षण सर्वांना मिळणार आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागत केले. अध्यक्ष स्थानी संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी होते. डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.