उपजिल्हाधिकारी लोढे यांचा गावोगावी सत्कार सोहळा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०२ :  तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत राज्यात २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन पदी निवड झाली. शेवगावचा भूमिपूत्राच्या या यशाबद्दल ठिकठिकाणी त्याचा सन्मान होत आहे.

शुक्रवारी बालमटाकळी येथे त्याची संवाद्य मिरवणूक काढून त्याचा नागरी सत्कार करण्यात आला. बालमटाकळीचे ग्रामदैवत बालंबिका देवी मंदिरात लोढे याच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांचे अविनाश लोढे भाचे असून मामाच्या उपस्थितीत अविनाशचा हृद्य सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना अविनाश म्हणाले, आजचा सन्मान हा मामाच्या गावामध्ये झाल्यामुळे हा सुवर्ण योग असून माझ्यासाठी अविस्मरणीय असा आहे. जिद्दीने आणि हिमतीने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो, या यशामागे माझ्या आई-वडिलांचे व नातेवाईकांचे, मामांचे आशीर्वाद, प्रेम व साथ मिळाल्याने क्लासवन अधिकारी म्हणून माझी निवड झाली. या पदाचा मी दिन दुबळ्यांची सेवा करत माझी वाटचाल आदर्श पद्धतीने करीन. असे मनोगत अविनाश यांनी व्यक्त केले. 

यावेळी ह.भ.प. साध्वी शितल देशमुख, राहुल गरड महाराज, रामेश्वर महाराज देशमुख, विक्रम लोढे, सरपंच डॉ. राम बामदळे, कृ.उ. बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, ज्ञानेश्वरचे माजी संचालक मोहन देशमुख, रोहन राजपुरे, सेवा संस्थेचे चेअरमन माणिक शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, कमुभाई शेख, ज्ञानेश्वरचे माजी संचालक चंद्रकांत गरड, रतन देशमुख, विठ्ठल देशमुख, भानुदास गलधर, बाबासाहेब भाकरे,

हरीशचंद्र घाडगे, विक्रम बारवकर, अशोक खिळे, प्रशांत देशमुख, संदिप देशमुख, हरीशचंद्र राजपुरे, बाबासाहेब देशमुख, अशोक वैद्य, भारत घोरपडे, गणेश शिंदे, भाऊसाहेब बामदळे, रोहीदास भोंगळे, रोशन बागडे, श्रीकांत राजपुरे, दिगांबर टोके, राम तांबे, योगेश दोडके, संदिप शिंदे, राजुदादा राजपुरे, संभाजी तिडके, राजेंद्र ढमढेरे पाटील, परमेश्वर शिंदे, बबन लोणकर उपस्थित होते.