शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा शेवगाव येथील खंडोबा मैदानावर मोठ्या उत्साहात हजारो भक्ताचे उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय धर्म, संस्कृती, परंपरा व थोर संतांनी दिलेली शिकवण याची माहिती जनसामान्यांना करून देणे व हिंदू धर्माची जोपासना व ओढ निर्माण करण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन आयोजक तथा जिल्हा निरीक्षक सोमेश्वर घोगरे यांनी केले.
भव्य शोभायात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शोभा यात्रेत प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्षमण तसेच संत गजानन महाराज असे विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले होते. संस्थानच्या प्रवचनकार बाबर यांचे अतिशय सुंदर असे अमृततुल्य प्रवचन झाले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नासिक पीठ कार्याध्यक्ष प्रवीण ठाकूर, जिल्हा अध्यक्ष सागर तिखे, महिला अध्यक्ष छाया ठाकरे, विभागीय निरीक्षक पांढरे, सुरेश राऊत तालुकाध्यक्ष भिमराव साखरे, कांता दळे यांचे सह जिल्ह्यातील सर्व समितीच्याचे पदाधिकारी व अनुयांयी उपस्थित होते. सर्वांनी नेटके नियोजन करण्यासाठी योगदान दिले.