आमदार काळेंनी अकरा गावाला न्याय दिला – अॅड.मुरलीधर थोरात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ :- कोपरगाव मतदार संघाला आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने लाभलेल्या कामदार लोकप्रतिनिधीने मतदार संघातील सर्वच गावाना निधी देवून मतदार संघाचा विकास साधण्याबरोबरच मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावाना देखील विकासाच्या बाबतीत न्याय दिला असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड.मुरलीधर थोरात यांनी म्हटले आहे.

कोपरगाव मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील नागरिक मागील काही वर्षांपासून खराब रस्त्यांना वैतागले होते. त्यामुळे या अकरा गावातील नागरिकांनी विकासाच्या अपेक्षा सोडल्या होत्या. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहाता तालुक्यातील अकरा गावातील नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षात हे स्वप्न पूर्ण करतांना तिर्थ क्षेत्र पर्यटन मधून १ कोटी निधीतुन

भव्य सभागृह तसेच इतर सुविधा व गावाअंर्तगत रस्त्यासाठी ७० लक्ष, पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २५ लाख, पुणतांबा-नपावाडी व संभाजीनगर ते वाकडी या दोन्ही रस्त्यांसाठी ९.६३ कोटी, पुणतांबा ईदगाह मैदानावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष तसेच अकरा गावातील विकासाच्या अनेक समस्या सोडविल्या असून मागील काही वर्षापासून रखडलेल्या अनेक रस्त्यांना निधी देवून

आ. आशुतोष काळेंमुळे चार किलोमीटरचा वळसा वाचणार -पिढ्यानपिढ्या रखडलेला वाकडी-चितळी रस्ता काट्या कुपाट्यात हरवला होता. या रस्त्याला आ. आशुतोष काळे यांनी ३ कोटी निधी देवून या रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्यामुळे समस्त वाकडी ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. वाकडी-चितळी रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना चितळीला जाण्यासाठी वाकडी फाट्यावरून जवळपास चार किलोमीटर अंतर जास्त वळसा घालून चितळीला जावे लागत असल्यामुळे या रस्त्याची रहदारी जवळपास थांबलीच होती. हे दळणवळण पुन्हा पूर्ववत होवून नागरिकांचा चार किलोमीटरचा वळसा यापुढे वाचणार असून शेतकरी बांधवांची देखील मोठी अडचण दूर होणार आहे. –आण्णासाहेब कोते (वाकडी)

दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न मार्गी लावले असून रामपुरवाडी-पुणतांबा रस्त्यासाठी २ कोटी, राहाता चितळी रोड-पुणतांबा रस्त्यासाठी २ कोटी, वाकडी-चितळी रस्त्यासाठी-३ कोटी निधी आणला असून या रस्त्याच्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या असून लवकरच कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पुणतांबा परिसराबरोबरच कोपरगाव मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावाचा विकास होवून या रस्त्यांमुळे पुणतांबा बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होणार आहे.

पुणतांबा परिसरातील आजुबाजुच्या गावातील नागरिकांवर पुणतांब्याच्या बाजारपेठेचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे रामपूरवाडी-पुणतांबा व राहाता चितळी रोड-पुणतांबा या रस्त्यामुळे पुणतांब्याची बाजारपेठ पुन्हा फुलणार असून राहात्याला जाण्यासाठी व कित्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी या रस्त्यांमुळे मोठी सोय होणार आहे.

त्यामुळे कोपरगाव मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्याच्या अकरा गावाचा विकास होवून नागरिकांची अनेक वर्षापासूनची अडचण दूर होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून आ. आशुतोष काळे यांचेप्रती नागरिकांनी आभार व्यक्त केले असल्याचे अॅड.मुरलीधर थोरात यांनी सांगितले आहे.