चासनळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शीला चांदगुडे यांची निवड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीला शशिकांत चांदगुडे यांची निवड झाली आहे. या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शीला चांदगुडे यांचे अभिनंदन केले आहे.

चासनळीचे माजी उपसरपंच विकास भाऊसाहेब चांदगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. नूतन उपसरपंच निवडीसाठी नुकतीच ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस माजी उपसरपंच विकास भाऊसाहेब चांदगुडे, ग्रामपंचायत सदस्य विनायक भाऊसाहेब गाडे, हिराबाई भास्कर पवार, प्रीती सुनील गायकवाड, अनिता कैलास पवार आदी उपस्थित होते.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवार कोल्हे गटाच्या शीला शशिकांत चांदगुडे यांना ७ तर काळे गटाचे उमेदवार शिवदत्त प्रल्हाद गाडे यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीत शीला शशिकांत चांदगुडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. पटाईत यांनी घोषित केले.

नवनिर्वाचित उपसरपंच शीला चांदगुडे यांचा ग्रामपंचायतमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहेर, चंद्रकांत चांदगुडे, विश्वास गाडे, प्रकाश गाडे, किशोर गाडे, कैलास चांदगुडे, राहुल चांदगुडे, मनोज गाडे, रवींद्र चांदगुडे, सुनील सुरभैय्या, कैलास धेनक, ज्ञानेश्वर धेनक, गौरव गाडे, शरद पवार, पवन चांदगुडे, भास्कर पवार, कैलास पवार आदींसह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.