शेवगाव प्रतिनिधी, दि.११ : शेवगाव येथे प्रथमच आयोजीत खासदार केसरी बैलगाडा शर्यतीस मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल २१६ स्पर्धकांनी सहभाग घेतला अत्यंत अतितटीच्या व रोमांचकारी झालेल्या या स्पर्धेत गंगापूरच्या गोपाळवाडी येथील मंथूर आणि आदत किंगसाई या बौलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. गाडा मालकास ५१ हजार रु. बक्षिस देऊन धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भाजपा उद्योजक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब ढोके यांनी हा उपक्रम परिसरात प्रथमच राबवून शेवगावकरांना या बैलगाडा शर्यतीच्या थरारक अनुभवाची संधी उपलब्ध करून दिली.
शनिवारी (दि.१०) कोरडे वस्ती प्रांगणात खासदार कैसरी बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, तालुकाध्यक्ष तुषार वैदय, गोकुळ दौंड, बाळासाहेब कोळगे, बाळासाहेब डोंगरे, म. अजय भारस्कर, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, गुरुनाथ माळवदे, तुषार पुरनाळे, भुषण देशमुख, शाम कणगरे, सुहास गर्जे उपस्थित होते.
२१६ स्पर्धकांमुळे २७ गट करण्यात आले. त्यांनंतर ७ गटात सेमिफायनल स्पर्धा घेण्यात आली. त्यातील सात बैलगाडयांची फायनल स्पर्धा झाली. यामध्ये प्रथम ५१ हजार रुपयांचे बक्षिस सुनिल भाऊंचा मंथूर, व देविदास महाराज जगताप यांचा आदत किंग साई गोपाळवाडी गंगापूर यांना देण्यात आले. तर व्दितीय ३१ हजार रु. महाराज ग्रुप ताहेरपूर संभाजीनगर, तृतीय २१ हजार रु. संदिप हरपळे, शरद मोरे उंबरे, चतुर्थ १५ हजार रु. अमोल ढगे, कबीर राठोड मंगळपूर, पाचवे ११ हजार मोहन वाखुरे जिंकढाण, सहावा क्रमांक ७ हजार धारेश्वर महाराज प्रसन्न जोडवाडी संभाजीनगर, सातव्या क्रमांक ५ हजार ९९९ रुपये बक्षिस चंद्रगिरी प्रसन्न बादल ग्रुप मांजरी यानी जिकले.
रात्री उशीरा विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते देण्यात आले. २७ गटामध्ये एक नंबर आलेल्या बैलगाडा मालकांना सायकल व स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. शासनाची परवानगी घेवून व लाईव्ह चित्रकरण करुन या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले.
अमर जाधव, अजय मगर, अमोल कोरडे, राजेंद्र मुरदारे, गणेश कोरडे, शिवाजी कोरडे, विड्डू गवळी, प्रविण कोठुळे, महेश घोगडे, विजय देवरे, अरुण सुतार, बाळासाहेब गवळी, ताराचंद घोडसे, सनी कोरडे, शंकर तटू, रविंद्र सुतार, माऊली गावडे आदीनी स्पर्धा आयोजक अमोल सागडे व अण्णा साहेब ढोके यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन केले. झेंडा पंच म्हणून राज निकम, समालोचक म्हणून प्रविण घाटे यांनी काम पाहीले. तर सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले.