शिर्डी येथे मराठा वधु-वर परिचय भव्य मेळाव्याचे आयोजन

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने रविवार २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हॉटेल शांतीकमल, शिर्डी बसस्थानकाशेजारी, मेन रोड, शिर्डी येथे मराठा वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिपक धट यांनी दिली. 

 ते म्हणाले की, या मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रीय अध्यक्ष सदानंद भोसले यांच्या हस्ते तर मराठा क्रांती स्वराज संघटनेचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. मराठा समाजाचे संघटन वाढवुन विवाह विषयक समस्या सोडविण्याचा मुख्य उददेश यातुन सफल होणार आहे.

 या वधु वर परिचय मेळाव्यात मराठा समाजातील नव वधु वर, विदुर, विधवा, घटस्फोटीत महिला किंवा पुरूष यांनी स्वतंत्र संगणकीकृत बायोडाटा, दोन पासपोर्ट साईजचे फोटो २० ऑक्टोंबर पुर्वी प्रत्यक्ष अगर बापू सुराळकर जिल्हा उपाध्यक्ष, भ्रमणध्वनी ९८६०४७४४४०, उत्तम घट राहाता तालुकाध्यक्ष भ्रमणध्वनी ९४२३१६०९११, सोमनाथ राशिनकर कोपरगाव तालुका सचिव, भ्रमणध्वनी ८२७५५२२२१४ येथे संपर्क साधुन नोंदणी करून जमा करावेत किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी घेवुन यावे तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी या मराठा वधु वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.