चासनळी येथे नवरात्र उत्सवानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : तालुक्यातील चासनळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगदंबा देवीचे नवरात्र उत्सवानिमीत्त १५ ते २४ ऑक्टोंबर पर्यंत ह.भ.प. बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ह.भ.प. भरत महाराज चांदगुडे (१५ ऑक्टोबर) ह.भ.प. गिताताई महाराज पोरवडकर (१६ ऑक्टोंबर), ह.भ.प.हर्षद महाराज थोरात (१७ ऑक्टोबर), ह.भ.प. कल्याण महाराज पवार (१८ ऑक्टोंबर, ह.भ.प.भानूदास महाराज बैरागी भारुडाचा कार्यक्रम (१९ ऑक्टोबर), ह.भ.प. साक्षी महाराज वर्डे (२० ऑक्टोबर), प.भ.प. दिलीप महाराज डहाळे सर (२१ ऑक्टोबर), होम हवन पुर्णाहुती व ह.भ.प. रामभाउ महाराज सोनवणे (२२ ऑक्टोबर) ह.भ.प. सागर महाराज दिडे (२३ ऑक्टोबर) तर २४ ऑक्टोंबर रोजी ह.भ.प. बाबुराव महाराज चांदगुडे या काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप होईल.

नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी चासनळी ग्रामस्थ ज्ञानेश्वर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, जगदंबा कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, हिंदुराज मित्र मंडळ आण्णाभाउ साठे, मानकेश्वर तरूण मित्र मंडळ, मुंबादेवी तरूण मंडळ, चासनळी जगदंबा माता व्यवस्थापक व यात्रा समिती, युवक युवती मंडळ व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशिल आहेत. या नवरात्र उत्सव काळात महिला भजनी मंडळ संगीत भजन, पहाटे काकडा, दुर्गा सप्तशती ग्रंथ सामुदायीक पारायण, देवी भागवत कथेवर प्रवचन, हरिपाठ, प्रहारा जागर कार्यक्रम नित्यनियमाने होतील.