आखेगाव फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : शेवगावातील आखेगाव रस्त्यावरील परिसरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील लोखंडी कंपाटातील आतील एक लाख १० हजार २९३ रुपये रक्कमेसह लॉकरच घेऊन अज्ञान चोरटयानी पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

Mypage

त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात संबधित बेलस्टार मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक रमाकांत शिवराज दाबरगिडे यांनी शेवगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

tml> Mypage

तालुक्यातील बोधेगाव परिसरात मागील आठवड्यात भर दिवसा सलग दोन घरफोडीच्या घटना घडलेल्या असून आता चोरट्यांनी शेवगाव शहराकडे लक्ष वेधल्याने पोलिस यंत्रणे समोर चोऱ्यांचा तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

Mypage

या संदर्भात सदर फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील सिसीटीव्ही मध्ये तसेच चोरी करून बाहेर जातांना काही व्यावसायिकाच्या सिसीटिव्ही कॅमेरॅमध्ये चोरटे कैद झाले आहेत. याच संस्थेत सुमारे चार वर्षापूर्वी सुद्धा चोरीचा अयशश्वी प्रयत्न झाला होता. 

Mypage