गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी दि.१३ : गोदावरी बायोरिफायनरीज लि.साकरवाडी व के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरवाडी येथे रविवारी (ता.१८) सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबिर होईल.

Mypage

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन होईल. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग आदी आजारांबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग चिकित्सा आदींबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत.

tml> Mypage

या शिबिरामध्ये मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराला उपस्थित राहणाऱ्यांनी आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे जनरल मनेजर प्रवीण विभूते तसेच के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबईच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिनू यांनी केले आहे.

Mypage